• shivsevak96k@gmail.com
  • 9503579696
  • ४६ , मजरेवाडी , होटगी रोड , दक्षिण सोलापूर , जिल्हा सोलापूर - ४१३२२४
मुखपृष्ठ मेन्यू नोंदणी संपर्क
PROGRAM DETAILS

दुर्गसंवर्धन व वारसा संरक्षण

"गडकोट संवर्धनातून राष्ट्राभिमान आणि सांस्कृतिक वारसा चे जतन"

Home / Programs / दुर्गसंवर्धन व वारसा संरक्षण
दुर्गसंवर्धन व वारसा संरक्षण
OVERVIEW & OBJECTIVES

About This Welfare Initiative

"गडकोट हे केवळ दगडांचे बांधकाम नसून, ते हिंदवी स्वराज्याचा मुलमंत्र, मराठी अस्मितेचे प्रतीक आणि आपल्या पूर्वजांच्या शौर्य, त्याग व राष्ट्रनिष्ठेचे अमर स्मारक आहेत." सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांत उभे असलेले हे दुर्ग स्वातंत्र्य, स्वाभिमान, पराक्रम आणि लोककल्याणाच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकोटांना स्वराज्याच्या संरक्षणाचे अभेद्य कवच मानत त्यांना सुशासन, सुरक्षा आणि जनकल्याणाचे केंद्रस्थान बनविले. त्यामुळे प्रत्येक गड हा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून राष्ट्रभक्ती आणि स्वराज्य प्रेरणेचे अखंड विद्यापीठ आहे.

आज अनेक गडकोट नैसर्गिक झीज, अतिक्रमण, प्रदूषण, निष्काळजीपणा आणि अनियंत्रित पर्यटनामुळे गंभीर धोक्यात आले आहेत. ढासळणारी तटबंदी, पडझड झालेले बुरुज, नष्ट होत चाललेले प्रवेशद्वार, गाळाने भरलेल्या पाण्याच्या टाक्या, ऐतिहासिक वास्तूंवरील विद्रूपीकरण आणि कचऱ्यामुळे आपल्या सांस्कृतिक वारसांचे मोठे नुकसान होत आहे. या अमूल्य वारसांचे संरक्षण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक शिवप्रेमी, दुर्गप्रेमी आणि जागरूक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित शिवसेवक दुर्गसंवर्धन समिती महाराष्ट्रातील गडकोटांचे शास्त्रोक्त, अभ्यासपूर्ण आणि लोकसहभागातून संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहे. गडकोट स्वच्छता अभियान, पारंपरिक वाटांचे संवर्धन, दिशादर्शक व माहिती फलक उभारणी, पाण्याच्या टाक्यांचे जतन, पर्यावरणपूरक कचरा व्यवस्थापन, ऐतिहासिक अवशेषांचे दस्तऐवजीकरण, तसेच तटबंदी, बुरुज आणि प्रवेशद्वारांच्या संवर्धनासाठी शासन, पुरातत्त्व विभाग आणि तज्ज्ञ संस्थांशी समन्वय साधून व्यापक कार्य केले जाईल.

यासोबतच दुर्गभ्रमण, इतिहास अभ्यासवर्ग, व्याख्याने, संशोधन उपक्रम, वृक्षसंवर्धन, वारसा जनजागृती अभियान आणि युवकांमध्ये इतिहासप्रेम व राष्ट्रभक्ती जागविणारे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील. गडकोट हे केवळ पर्यटनस्थळ नसून प्रेरणा, संस्कार आणि राष्ट्रीय अभिमानाची पवित्र स्थाने आहेत, ही भावना समाजात दृढ करणे हेच आमच्या कार्याचे मुख्य ध्येय आहे.

"गडकोट वाचले तर इतिहास वाचेल; इतिहास वाचला तर संस्कृती टिकेल; संस्कृती टिकली तर स्वाभिमान जागा राहील; आणि स्वाभिमान जागा राहिला तर हिंदवी स्वराज्याची प्रेरणा युगानुयुगे अखंड प्रज्वलित राहील." या अढळ विश्वासाने शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक दुर्गसंपदेचे जतन, संवर्धन आणि वारसा संरक्षणासाठी सदैव समर्पित, सज्ज आणि कटिबद्ध राहील.
Verified Community Impact
Thousands of lives touched across 36 districts
Targeted Execution

Programs are executed at the grassroots level by verified District Coordinators across Maharashtra.

80G Tax Deductible

All financial contributions for this program receive instant 80G tax exemption certificates.

Volunteer Driven

Powered by 12,000+ dedicated volunteers working with zero administrative overhead.